Tiranga Times Maharastra
. बॉक्स ऑफिसपासून समीक्षकांपर्यंत चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद रंगताना दिसतोय.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट असलेला ‘इक्कीस’ 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
श्रीराम राघवन म्हणाले की, ‘धुरंधर’ हा उत्तम चित्रपट आहे, कलाकारांचा अभिनय जबरदस्त आहे, पण ती आमची शैली नाही. आदित्य धरची स्टाईल फॉलो करणं किंवा ‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं हे माझ्यासाठी मूर्खपणाचं ठरेल. आम्हाला आमच्या प्रकारचे, वेगळ्या धाटणीचे सिनेमे करायला आवडतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘इक्कीस’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत सिमर भाटिया आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
dhurandhar-movie-shriram-raghavan-statement
